श्री संगमेश्वर महादेव मंदिर, इंजनगाव – महाशिवरात्रीच्या दिवशी भक्ती, उत्साह आणि दिव्यतेचा अनोखा संगम!
इंजनगाव (ता. वसमत) – गावातील प्रसिद्ध श्री संगमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा भव्य सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. गावातील तसेच आजूबाजूच्या गावांतील शिवभक्तांनी या पवित्र दिवशी महादेवाचे दर्शन घेतले .

महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. पहाटेपासून अभिषेक सुरू झाला. भाविकांनी श्रद्धेने शिवलिंगावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक व बेलपत्र अर्पण केले. यावेळी मंदिरात “हर हर महादेव” आणि “शंकराच्या जयघोषांनी” परिसर दुमदुमून गेला होता.
गावातील तसेच आसपासच्या गावांतील भाविक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले. गावातील जेष्ठ नागरिक आणि युवकांनी उत्सवासाठी विशेष व्यवस्थापन केले होते, जेणेकरून सर्व भाविकांना सुरळीत दर्शनाचा लाभ घेता येईल
या निमित्ताने मंदिर परिसराची भव्य सजावट करण्यात आली होती. विविध रंगांच्या फुलांचे तोरण, बेलपत्रांची मांडणी आणि आकर्षक सजावटींमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला. गाभाऱ्याच्या तसेच मंदिराच्या संपूर्ण परिसरात दिव्यांची भव्य रोषणाई करण्यात आली होती. ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि दिव्यप्रभेने उजळून निघाले. मंदिर अधिक भव्य आणि मंगलमय भासले. शिवलिंगावर पारंपरिक बेलपत्रांचे सुंदर अलंकरण करण्यात आले होते, तर संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळून गेल्याने एक भक्तिपूर्ण आणि अद्वितीय दृश्य निर्माण झाले होते.
महाशिवरात्री निमित्त गावातील महिला मंडळाने विशेष भजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवलीलामृत पारायण सोहळा सुरू असल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे.
आरतीच्या वेळी मंदिरातील घंटानाद, शिवभक्तांचा गजर आणि “ॐ नमः शिवाय” च्या अखंड जपाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी श्रद्धेने शिवलिंगाची पूजा करून आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेतला.
महाशिवरात्रीच्या पवित्र सोहळ्यात गावकरी, आजूबाजूच्या गावातील भाविक तसेच लहान-मोठे, स्त्री-पुरुष सर्वांनी सहभाग घेतला आणि हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते आणि संगमेश्वराच्या कृपेने हा सोहळा अत्यंत भव्य आणि मंगलमय पार पडला.
🚩 हर हर महादेव! 🚩
संदूक न्यूज – बातमी, चर्चा आणि संवादासाठी! (www.sandooknews.com)