Super Abacus तर्फे राष्ट्रीय हिवाळी अजिंक्यपद स्पर्धा आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

छत्रपती संभाजीनगर, संदूक न्यूज: सुपर अबॅकसच्या वतीने आयोजित राष्ट्रीय हिवाळी अजिंक्यपद स्पर्धा (National Winter Championship) आणि पुरस्कार वितरण सोहळा १९ जानेवारी २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा संकुल, सुतगिरणी चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
देशभरातून आलेल्या अनेक स्पर्धकांनी या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धा अत्यंत चुरशीची आणि रोमांचक ठरली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्ता कौशल्याचे प्रदर्शन करत उत्कृष्ट कामगिरी केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मा. सौ. अंजली धनोरकर (उपजिल्हाधिकारी) आणि श्री. सुनील देसरडा (प्रसिद्ध उद्योजक आणि Lions Clubs International चे Multiple Council Chairperson) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी मनीष महाजन (संचालक, सुपर अबॅकस) होते.
स्पर्धा विविध १४ विभागांत आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक विभागातील पहिले पाच विजेते अशा एकूण ७० विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके देण्यात आली.स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला Congratulations Trophy आणि सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
संपूर्ण वर्षभर उत्कृष्ट व्यवसायिक कामगिरी करणाऱ्या केंद्र चालकांना Business Excellence Award ने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर आपल्या केंद्रात विद्यार्थ्यांसाठी प्रभावी Brain Gym Activities आयोजित करणाऱ्या केंद्रांना विशेष पुरस्कार देण्यात आले.
सुपर अबॅकस परिवारात नव्याने सामील झालेल्या आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या केंद्रांना Best Startup Unit पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या भव्य दिव्य सोहळ्याला ९०० हून अधिक विद्यार्थी, पालक आणि केंद्र चालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने करण्यात आले.



संदूक न्यूज – बातमी, चर्चा आणि संवादासाठी!